loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शहरात संत शिरोमणी रोहिदास जयंती उत्साहात साजरी

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा शहरातील हरिजन वाडीत संत शिरोमणी रोहिदास महाराज‎ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास‎ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन‎ करण्यात आले. या कार्यक्रमात संत शिरोमणी रोहिदास‎ महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात‎ आला.‎ मानवता हाच खरा धर्म यांची शिकवण देणारे संत‎ शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे‎ अविरत प्रवाहीत राहावा या उद्देशाने युवा मंचातर्फे‎ तरुणांनी एकत्र येऊन संत शिरोमणी रोहिदास‎ महाराज जयंती साजरी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सौरभ संजीव गोरेगावकर, सिद्धेश म्हशीलकर, पंकज वाळवाटकर, योगेश चांदोरकर, प्रतीक गोरेगावकर, सूरज वाळवाटकर, समर्थ म्हशीलकर व समाजाचे ज्येष्ठ सुरेश चांदोरकर, सुभाष वाळवटकर, गणेश चांदोरकर, स्वप्नील चांदोरकर, मंगेश म्हशीलकर, सरोज म्हशीलकर, गणेश म्हशीलकर व सर्व महिला मंडळ आणि समाज बांधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg