loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे आज संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिरामध्ये गुरुप्रतिपदेला सोमवार दि.2 फेब्रुवारी रोजी संत सोहिरोबानाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या जयंती सोहळ्यापासुन श्रीरामनवमीपर्यंत नाथ सेवा उत्सव चालणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी सकाळी 10 वाजता संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर तीर्थप्रसादास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजता संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन होईल. सायंकाऴी 5 वाजता स्थानिक महिलांची भजन सेवा होईल. 7.15 ला नित्य सायंआरती होईल त्यानंतर स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा होईल.

टाइम्स स्पेशल

नाथांच्या जयंतीपासून नाथ सेवा उत्सव आरंभ होत आहे. नित्य मंगळवारची भजन सेवा व गुरुवारची दुपारची आरती यांच्यासह उत्सव काळात दर मंगळवारी सायं 5 ते 6 या वेळेत श्रीराम नामाचा जप होणार आहे. तसेच दर गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे. हा नाथ सेवा उत्सव नाथांचा निर्वाणदिन असलेल्या रामनवमीपर्यंत चालणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवेकरी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg