loader
Breaking News
Breaking News
Foto

सुनिल तटकरेंनी विलीनीकरणाबाबतच्या चर्चेला दिला पूर्णविराम

, मुंबई: आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष... दादांनी दिलेला विचार ...घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आज अस्थी कलश पूजनासाठी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी संवाद साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काल सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावर प्रत्येकजण आपली मते मांडू शकतो, त्यांना तो अधिकार आहे पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचे विकसित महाराष्ट्र हे स्वप्न दृढ करण्यासाठी वहिनींनी शपथ घेतली. त्यामध्ये कुणाला गैर वाटण्यासारखे काही नाही, असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला. आमच्या पक्षाचा राज्यसभेतील उमेदवार कोण करायचा हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे. भाजपने नेहमीच आम्हाला सहकार्य केले आहे. पक्षाचे मंत्रीमंडळ करत असताना व इतर निर्णय करत असताना भाजपने आम्हाला सूचना केल्या नाहीत उलट मित्र पक्षाला सौहार्दाने व सन्मानाने वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एनडीएमध्ये भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाखाली अनुभवायला मिळते याचा मी साक्षीदार आहे असेही सुनील तटकरे म्हणाले. पक्ष विलीनीकरणाची चर्चा ही अंत्यसंस्कार होण्यापूर्वी का आणि कशासाठी सुरू करण्यात आली, असा प्रश्न तुम्ही का विचारु शकत नाही असा सवाल सुनील तटकरे यांनी माध्यमांना विचारला.

टाइम्स स्पेशल

विलीनीकरणाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा एक सामूहिक निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही आमच्या मुळ सेक्युलर विचारधारेशी ठाम रहात. शिव -शाहू -फुले -आंबेडकर यांच्या सामाजिक समतेशी ठाम रहात आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे एनडीएसोबत राहण्याचा निर्णय कायम राहिल. या भूमिकेशी सुसंगत असतील ते निर्णय करतील तो निर्णय त्यांनी करायचा आहे. एनडीएसोबत जाण्याचा निर्णय दादांनी विचारपूर्वक घेतला होता त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत असेही सुनील तटकरे यांनी ठामपणे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg