रत्नागिरी (डिजीटल डेस्क)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टिका करीत आहेत. गाव पातळीवर घरोघरी उमेदवारांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. वाडी-वस्त्यांवर प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदार संघातील गावागावांतून मुख्य कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी समोरासमोर लढत असून काही ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टी देखील स्वबळावर लढत आहे. ज्याठिकाणी महायुती म्हणून निवडणुक लढविली जात आहे, तेथे संघर्ष कमी आहे.
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी मोठ्या ताकतीनिशी शिवसेना पक्षासमोर लढत आहे. काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड विधानसभा मतदार संघात भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढताना दिसत आहेत. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी संघर्ष आहे. चिपळूणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणुक लढत आहे काही उदय बनेंसारखे उमेदवार अपक्ष निवडणुक लढवित असून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. संगमेश्वर तालुक्यात कोसुंब मतदार संघात शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष आहे. सिंधुदुर्गात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष कायम असला तरी, शिवसेना आणि भाजपा देखील काही ठिकाणी समोरासमोर लढत आहेत. एकंदरीतच कोकण विभागात महायुती अंतर्गत शिवसेना भाजपा संघर्ष दिसून येत आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.