loader
Breaking News
Breaking News
Foto

अंत्रवली गावी शास्त्रीतिरी संत वारकरी संप्रदाय मेळावा उत्साहात साजरा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - ग्रंथ श्रेष्ठ श्री, ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा वरील ठिकाणी आयोजित करणेत आला होता. या वेळी लहान मोठे, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष मुली बाळी भक्ती रसात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत होते, जणु काही भक्तांची पंढरीची वारी अंत्रवली गावी आल्याचा आभास निर्माण झाला होता. हा सोहळा ह.भ.प. काशीराम भुरवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी तालुक्यातील पिरादवणे माळवाशी, वाशी, लोवले मुचरी पासून ते अगदी सह्याद्रीच्या कुशीतील नायरी, निवळी, शृंगारपूर आदी चाळीस गावातील हजारो वारकरी मंडळींनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी पहाटे स्थानिक वारकरी यांनी तीन वाजता वीणा व घट पुजनकरून या कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर काकड आरती, ह.भ.प. काशीराम महाराज यांचे ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी मुरादपूर येथील ह.भ.प. रमेश बंlडागळे महाराज यांचे प्रवचन, त्यानंतर समुदाईक हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 वा, ह.भ.प. संजय कांबळे महाराज यांचे हरिकीर्तन झाले. दहा वाजता महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करणेत आली. या कार्यक्रमाचे निमंत्रक ह.भ.प. सदाशिव बांचीम होते. पुर्ण कार्यक्रमासाठी विणेकरी स्वयम करंडे, मृदंगमणी हर्ष साळवी आणि प्रथमेश वाघे यांची साथ लाभली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg