loader
Breaking News
Breaking News
Foto

लोरे पं. स. मतदार संघातून भाजपाचे सिद्धेश रावराणे यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेगवान

वैभववाडी (प्रतिनिधी) - लोरे पंचायत समिती मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे युवा उमेदवार सिद्धेश दिलीप रावराणे यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि वेगवान होताना दिसत आहे. सध्या ते मतदार संघातील गावागाव जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत असून सर्व स्तरातील नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच तरुणांशी संवाद साधत ते आपल्या प्रचाराला धार देताना दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी वित्त बांधकाम सभापती तथा जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचे सिद्धेश दिलीप रावराणे हे सुपुत्र हे या राजकारणात नविन चेहरा असल्या तरी त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांची जाण आणि मतदार संघातील विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका मांडताना त्यांचा आत्मविश्वास दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत असल्याचे चित्र सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे. गावागावात घेतल्या जाणाऱ्या सभा, पदयात्रा आणि नागरिकांशी साधला जाणारा थेट संपर्क यामुळे त्यांच्या प्रचाराला वेग मिळत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg