loader
Breaking News
Breaking News
Foto

माटणे जिल्हा परिषद मतदार संघात राजेंद्र म्हापसेकर यांची प्रचारात आघाडी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - माटणे जिल्हा परिषद मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र म्हापसेकर याना या मतदार संघातून उमेदवारी दिली गेली नाही. यामुळे हट्टाला पेटलेल्या राजेंद्र म्हापसेकर यांनी भाजपा महायुती उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आपल्या सोबत काही पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन जोरदार प्रचार प्रत्येक गावात सुरू केला आहे. दिवसरात्र प्रचार करत आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे म्हापसेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माटणे जिल्हा परिषद मतदार संघातून राजेंद्र म्हापसेकर यांनी पक्षाकडून उमेदवारी दिली नाही. यामुळे निराश झालेल्या राजेंद्र म्हापसेकर यांनी या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील, माटणे, तळेखोल, विर्डी, वझरे, उसप, पिकुळे, झरेबांबर, झरे पुनर्वसन, पाल पुनर्वसन, आयी, आंबडगाव, आंबेली, इतर गावात जाऊन जोरदार प्रचार करत आहेत. शिवाय त्यांच्या सोबत असलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राजेंद्र म्हापसेकर यांचा प्रचार करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg