दापोली (शशिकांत राऊत) - कोकणी माणसाचेच नव्हे तर पुण्या मुंबईकरांच्याही तोंडाला पाणी आणणारे ओले काजूगर दापोली शहराच्या स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या हंगामातील नव्याची नवलाई म्हणून काजूगर महाग असले तरी खवय्यांनी चढया दराने देखील विकत घेण्याठीची सकाळी सकाळीच गर्दी केली होती. बदलत्या वातावरणामुळे यावर्षी आंबा काजूचा हंगाम लांबला आहे. दापोलीत दरवर्षी डिसेंबर महीण्यात सुरु होणारा काजू हंगाम यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किरकोळ प्रमाणात हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या काजूगरांना चांगलाच दर मिळत आहे. 10 रुपयांचे 3 काजूचे गर या प्रमाणे काजूगर विकले जात आहेत. तरीसुध्दा नव्या हंगामातील काजूगर म्हणून ओले काजूगर खरेदीसाठी खवय्ये गर्दी करत आहेत. कोकणातील ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरांतील हॉटेल्समध्ये भाजीसाठी, मटण व मच्छी करीमध्ये ओले काजूगराचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांमधील रस्स्यामध्ये ओले काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात. महिला हा रानमेवा मुबलक प्रमाणात विकायला घेऊन येतात. या ओल्या काजूगराला हंगामामध्ये बाजारात खूप मागणी असते. या काजूगराचा हंगाम जानेवारीपासून चालू होतो. मात्र या वर्षी हा हंगाम वातावरणातील बदलामुळे लांबला असून तो फेब्रुवारीत सुरू झाला आहे.
काजूचे फळ तयार होण्यापूर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. ओले काजूगर काढण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. हिरव्या कच्च्या काजू बीमधले ओले काजूगर ही कोकणातील खासियत. उपवासाच्या उसळीत आणि झणझणीत काजू बटाटा रश्यातही हे काजूगर आवडीने खाल्ले जातात. फणसाच्या कुयरीच्या भाजीत आणि मटणामध्येही काजू अलगद सामावले जातात. गरम मसाल्याच्या आमटीत, शेवग्याच्या शेंगा किंवा मसालेभातातही या ओल्या काजूगराची लज्जत आणखीनच वाढते. मांसाहारी मंडळी जसे कोंबडीच्या सागोती वडयांचा बेत आखतात तेव्हा त्या सागोतीत देखील काजूगर घातले जातात. तसे ते चिकण मटणातही घातले जातात. तसेच कोलमाची सुकट शेकटाच्या शेंगा आणि कडव्यांचे दाणे बटाटा घालुन केलेल्या काजुगरामुळे अतिशय रुचकर अशी भाजी खायला चवीला लागते.
ओले काजूगर बाजारात दाखल झाले असले तरी हे काजूगर अजूनही म्हणावे तसे मुबलक प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी आलेले नसल्याने काजूगर भाव खाऊन गेले आहेत. या वर्षीच्या हंगामातील सोमवारी आज पहिल्यांदाच दापोली शहरातील बाजारपेठेत काजूगर विक्रीसाठी आणले असले तरी ते महाग असल्याने ईतके महाग काजुगर खरेदी करण्याची इच्छा असूनही खवय्यांचा भरमसाठ किंमतीमुळे चांगलाच हिरमोड झाला. बाजारपेठेत विक्रीसाठी आणले गेलेले काजूगर हे नव्याची नवलाई असले तरी काजूगर अद्याप कोवळा असल्याने बहुसंख्य खवय्ये केवळ काजूच्या 'दूर-दर्शना'वरच समाधान मानत आहेत. दापोली शहराच्या बाजारपेठेत तालूक्यातील तेरेवायंगणी येथील अनिता अनंत शिगवण या शेतकरी महिलेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दापोली बाजारपेठेत सलग तिस-या वर्षी काजूगर विक्रीसाठी आणण्याचा पहिला मान पटकावला आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.