loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवली पं. स. गणातून महायुतीकडून भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांची प्रचारात आघाडी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गावोगावी मंगेश जोशी यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. महायुतीच्या एकसंध ताकदीवर आणि भाजपच्या संघटनात्मक बळावर मंगेश जोशी यांनी प्रचारात आक्रमक शैली स्वीकारली आहे. विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत त्यांनी मतदारांचा विश्वास मिळवला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी केलेली ठोस मांडणी मतदारांना भावत आहे. प्रचारादरम्यान झालेल्या सभा, बैठका आणि घराघरात केलेल्या भेटींमधून जनतेचा कौल स्पष्टपणे मंगेश जोशी यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. “काम करणारा उमेदवार हवा” अशी भावना मतदारांमध्ये असून, तीच भावना मंगेश जोशी यांच्या प्रचारात ठळकपणे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकदिलाने मैदानात उतरल्याने विरोधकांची चांगलीच गोची झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, तळवली पंचायत समिती गणात सध्या महायुतीचे पारडे जड असून मंगेश जोशी यांची आघाडी निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. एकूणच, तळवली गणात मंगेश जोशी यांचा प्रचार वेग घेत असून, ही निवडणूक महायुतीच्या विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg