loader
Breaking News
Breaking News
Foto

‘शंभर टक्के विकास’ करण्याची ग्वाही; विकासासाठी महायुतीला साथ द्या – पालकमंत्री नितेश राणे

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : साटेली भेडशी येथे आयोजित जाहीर सभेत पालकमंत्र्यांनी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विकासकामांना अधिक गती देत सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः या भागात वाढलेल्या हत्तींच्या त्रासाची शासनाला पूर्ण जाणीव असून हा प्रश्न मंत्रालय पातळीवर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विकासकामांना विरोध करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे ही निष्ठावान कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे सांगत संघटनात्मक एकजूट आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली-भेडशी परिसराच्या विकासासाठी नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. जनतेचा विश्वास मिळाल्यास “शंभर टक्के विकास” करण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दोडामार्ग तालुक्याची निर्मिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्यकाळात झाल्याची आठवण करून देत तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला. हत्तींच्या त्रासासह परिसरातील एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सभेला आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उमेदवार दिपक गवस, पंचायत समिती कोलझर बिनविरोध उमेदवार तसेच शिवसेना दोडामार्ग प्रमुख गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निबाळकर, संतोष नानचे, प्रेमानंद देसाई यांच्यासह सुधीर दळवी, राजू निंबाळकर, संजय सातार्डेकर, सायली निंबाळकर, श्वेता धर्णे व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg