मालवण (प्रतिनिधी) - डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे मुंबई विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे आयोजित उडान महोत्सव २०२५-२६ मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. या उडान महोत्सवातील पथनाट्य स्पर्धेत ‘ई - कचरा’ या विषयावर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी नाटिकेला सुवर्णपदक मिळाले. या सादरीकरणात सौरभ चव्हाण, रामचंद्र बिलये, रोहन गावडे, प्रेरणा शेलटकर, नमिता पारकर, भार्वी शिरसेकर, गौरी रेवंडकर, स्नेहा सनये, सुनीता चव्हाण, हेमा केरकर यांनी भूमिका साकारल्या, तर प्रथम येसाजी आणि निखिल पेडणेकर यांनी संगीतसाथ दिली. या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन महेक शेख यांनी केले.
पोवाडा स्पर्धेत ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सादर केलेल्या पोवाड्याला रौप्यपदक प्राप्त झाले. या गटात सौरभ चव्हाण, प्रेरणा शेलटकर, समीक्षा तावडे, दीक्षा सावंत, हेमा केरकर, नमिता पारकर, आकांक्षा परब, गौरी रेवंडकर तसेच संगीत साथ करणारे प्रथम येसाजी व निखिल पेडणेकर आदी सहभागी होते. या सादरीकरणाचेही लेखन व दिग्दर्शन महेक शेख यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेत ‘Environment Conservation’ या विषयावर भाषण सादर करणाऱ्या मेगल डिसोझा हिने रौप्यपदक पटकावले. तसेच सृजनशील लेखन स्पर्धेत मेगल डिसोजा हिनेच ‘Social Media Addiction’ या विषयावर लेख सादर करून कांस्यपदक मिळवले. या यशामागे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या विस्तार कार्य शिक्षिका प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या विभागाचे विद्यार्थी व्यवस्थापक सौरभ चव्हाण आणि प्रेरणा शेलटकर यांनी नियोजन, सराव आणि सादरीकरण यामध्ये योगदान देत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ.सुमेधा नाईक आणि प्रा. रामचंद्र तावडे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. कुणाल जाधव (मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते चषक, पदके व प्रशस्तीपत्रके प्रदान करून गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळचे अध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ऍड. समीर गवाणकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.