loader
Breaking News
Breaking News
Foto

पोईप येथे उबाठाचा डोअर टू डोअर प्रचार

पोईप (वार्ताहर) - मालवण तालुक्यातील पोईप सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा सेनेच्या उमेदवारांनी पोईप वेताळ मुंजेश्वराला साकडे घालुन प्रचाराचा केला शुभारंभ. पोईप सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा सेनेच्या जिल्हा परिषद उमेदवार अँड. पुजा चव्हाण व पंचायत समिती उमेदवार प्राजक्ता परब यांनी नुकताच पोईप येथील श्री देव वेताळ मुंजेश्वर मंदिरात भेट देऊन देवाला श्रीफळ देऊन व साकडे घालुन प्रचाराचा शुभारंभ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोईप गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांना आपले मत देऊन निवडून आणण्याचे आवाहन केले आहे, येथील मतदार जनतेतुनही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार अँड. पुजा चव्हाण व पंचायत समिती उमेदवार प्राजक्ता परब यांनी आम्हाला निवडून देऊन तुमच्या विकास समस्या मार्गी लावण्याची संधी आम्हाला एकवेळ द्यावी तुम्ही आमच्यावर टाकलेली जबाबदारी आणि विश्वास सार्थकी लावू असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

यावेळी त्यांच्या सोबत उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विभागप्रमुख विजय पालव, गिरीश पालव, राजेंद्र पालव, विठ्ठल नाईक, विलास सांडव, बाळा सांडव, गणेश सांडव, शाखाप्रमुख अनिल येरम, अरुण माधव, बबलू वेंगुर्लेकर, समिर लाड, आदि ओम लाड, शाखाप्रमुख दिगंबर सावंत, दुर्गेश सावंत, विजय बाबुळकर, संजय भोईटे, बबन तावडे, सायली पालव, अस्मिता सांडव, विद्या बाबुळकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg