loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रयत्नानंतर ESIC सेवा दवाखान्याचा लोटे येथे शुभारंभ

खेड (दिलीप देवळेकर) - कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कायदा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना 2023 पासून लागू झाला. त्यानंतर, सर्वाना ESIC अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक केले होते. त्यानंतर बहुतांशी कंपन्यांनी व कंपनीमधील ठेकेदारांनी तसेच त्यांच्या कर्मचा-यांची ESIC अंतर्गत नोंदणी केलेली आहे. परंतु लोटे परशुराम औद्योगिक वसाहती नजीक ESIC चे प्रायमरी सेंटर नसल्याने सदर सेवेचा लाभ घेण्यास कर्मचा-यांना अनेक अडचणी येत होत्या. ESIC सेवा दवाखाना सुरु करण्यासाठी लोटे परशुराम उद्योजक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच परिसरातील मोठ्या दवाखान्यांसोबत ESIC दवाखाना जोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच हा दवाखाना लोटे नजिकच होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. लोटे येथील घरडा हॉस्पीटल व परशुराम हॉस्पीटल, चिपळूण येथिल डेरवण हॉस्पीटल यांना द्वितीय व तृतीय दर्जाच्या उपचारांकरिता ESICला जोडण्यात आले आहे. परंतु प्राथमिक उपचार सेवा केंद्र नसल्याने कर्मचा-यांना रत्नागिरी येथे जावून रेफरल लेटर आणावे लागत होते. त्यामुळे कामगारांची खुपच गैरसोय होत होती याचा कोणताही फायदा कामगारांना घेता येत नव्हता. याअनुषंघाने ESIC चे प्राथमिक केंद्र लोटे येथे सुरु व्हावे अशी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनने सातत्याने मागणी केली व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी याबाबत तात्काळ दखल घेतली व तशा सुचना संबंधित विभागाला दिल्या. उद्योग मंत्र्यांच्या निर्देशानुसार लोटे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) सेवा दवाखान्याच्या प्राथमिक केंद्राचा शुभारंभ झाला आहे. या दवाखान्यामध्ये ESIC नोंदणीकृत कर्मचारी व त्यांच्या कुटुबियांना मोफत उपचार घेता येणार असून पुढील उपचार हे टायअप असणा-या दवाखान्यामध्ये होणार आहेत. तरी याचा लाभ सर्व कर्मचा-यांना घेता येणार आहे. उद्योजक संघटनेने सदर दवाखान्यासाठी खुप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, संघटनेचे जनरल सेक्रेटरी राजकुमार जैन, संचालक शिरीष चौधरी, संकेत मेहता, घरडा फाउंडेशनचे सतिश वेंगुली, गोपाल थंपी, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ESIC) कोल्हापूरचे अधिकारी डॉ. मिलींद चौधरी, इतर मान्यवर, उद्योजक, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापक, लेबर कॉन्ट्रॅक्टर व कर्मचारी उपस्थित होते

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg