loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना विरुद्ध शिवसेना! प्रचारार्थ उभे करण्यात आलेले फ्लेक्स ठरतायेत लक्षवेधी

केळंबे-लांजा(वार्ताहर): लांजात जिल्हापरिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारासाठी प्रभावी यंत्रणा राबविली जात आहे. लांजात दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचीच चर्चा रंगू लागली आहे. प्रचाराठी सध्या महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून कोर्ले फाटा येथे दोन भले मोठे फ्लेक्स आमने सामने उभे करण्यात आल्याने सदर फ्लॅक्स लक्षवेधी ठरत असुन आता फ्लॅस वार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परीषद,पंचायत समितीच्या निवडणुका तालुक्यात लक्षवेधी ठरल्या आहेत. ४ जिल्हा परीषद आणि ८ पंचायत समिती गणातून प्रभावी प्रचार यंत्रणा पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते राबवित आहेत. मोजकेच दिवस निवडणुकीला उरले असल्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रचार राबवून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सध्या फ्लॅक्स बॅनरवर भर दिला जात असल्याचे दिसुन येत आहे.

टाइम्स स्पेशल

लांजात कोर्ले फाटा येथे भले मोठे फ्लेक्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि उबाठा शिवसेना पक्षाकडून आमने सामने आहेत. मोठे फ्लॅक्स उभे करण्यात आल्यामुळे दोन शिवसेना पक्षातच प्रमुख लढतीचे आणि चुरशीचे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आसगे जिल्हा परीषद आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हे समोरा समोर शिवसेना पक्षाचे असल्यामुळे यांच्या प्रचारार्थ फ्लॅक्सची लागलेली चढाओढीची चर्चा केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg