रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत अनेकांच्या अस्तित्वाची लढाई सुरु असून जबरदस्त चुरस वाढली आहे. जिल्ह्यातील हायव्होल्टेज लढतींकडे सार्यांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामध्ये असगोली, सावर्डे, खेर्डी, शृंगारतळी, कडवई, साडवली, धामापूर, वेळणेश्वर, भांबेड, हातखंबा, गोळप, मालगुंड या निवडणुकांमध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. यावेळी शिवसेना पक्षाची विभागणी झाल्याने त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. अपक्ष आणि मनसे, वंचित उमेदवारांनी निवडणुक चांगलीच तापवली आहे.
गुहागर तालुक्यात असगोली जिल्हा परिषदेची निवडणुक अत्यंत चुरशीची होत आहे. या ठिकाणी उत्तर रत्नागिरी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव हे निवडणुक लढवित आहेत. आमदार भास्करराव जाधव यांचे ते सुपुत्र असून माजी जि.प. अध्यक्ष आहेत. सावर्डे जिल्हा परिषद गटात सौ. पूजा शेखर निकम या निवडणुकीच्या रणांगणात असून त्यांचे विरोधात माजी सभापती सौ.दर्शना शिंदे या शिवसेनेच्या उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असून त्यातील घटक पक्षाने ही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सौ. पूजा निकम यांना अधिक चांगले वातावरण आहे. कोसुंब गटाची निवडणुक लक्षवेधी ठरत आहे. रोहन बने शिवसेना पक्षाचे उमेदवार असून भाजपचे प्रमोद अधटराव हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. इथे मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र रोहन बने यांना अधिक सजग राहण्याची गरज आहे. साडवली जिल्हा परिषद गटात नेहा रविंद्र माने या ठाकरे शिवसेनेच्या रिंगणात असून त्यांचा मतदार संघात चांगलाच संपर्क असल्याने त्यांना ही निवडणुक अधिक सोपी जाण्याची शक्यता आहे. त्यांना जिल्हा परिषद गटात मोठे पाठबळ लाभले आहे.
कडवई जिल्हा परिषद मतदार संघात संतोष थोराडे उबाठा शिवसेनेचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद मस्के निवडणुक रिंगणात आहेत. धामापूर तर्फे संगमेश्वर जि.प. गटात शिवसेना उबाठा गटाचे सहदेव बेटकर रिंगणात आहेत. ते माजी जि.प. सदस्य आहेत. हातखंबा जि.प. गटात अपक्ष उमेदवार आणि माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम हे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार निवडणुक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात ऍड. सुयोग नंदकुमार कांबळे हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणुक लढवीत आहेत. परशुराम कदम यांचे शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे ऍड. कांबळे यांना अधिक सोयीचे झाले आहे. वेळणेश्वर मतदार संघात नेत्रा ठाकूर या शिवसेना पक्षाच्या उमेदवार आहेत. आणि पडवे गटाचे उमेदवार सचिन बाईत हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आपले भवितव्य आजमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. खेर्डी चिपळूण जि. प. गटात दिशा दाभोळकर राष्ट्रवादीच्या उमेदवार असून भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष समिश मोरे यांच्या पत्नी सौ. रावी मोरे येथे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. त्यामूळे येथे मोठी चुरस आहे. गोळप जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी असा ठरणारा आहे. कारण रत्नागिरी तालुक्यातील ४ जि.प. मतदार संघात यापूर्वी विविध ठिकाणी विजयी ठरलेले उदय बने प्रथमच अपक्ष म्हणून या मतदार संघात निवडणुक लढवित आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीच्या नंदा मुरकर आहेत. ही निवडणुक बने यांच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.