loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा विभागातील शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती चा विजय असो, येवून येवून येणार कोण....? महायुती शिवाय आहे कोण! अशा घोषणांनी आचरा बाजारपेठ दुमदुमून गेली होती. आचरा बाजारपेठेत काढण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार रॅलीला शिवसेना भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मच्छीमार्केट पासून निघालेली प्रचार रॅली आचरा तिठयावरुन शिवसेना प्रचार कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रचार रॅलीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे यांसह शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे, आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, जेरोन फर्नांडिस, अभय भोसले, भाऊ हडकर, जयप्रकाश परुळेकर, रुपेश पाटकर, संतोष मिराशी, चावल मुजावर, पंकज आचरेकर, विजय कदम, ज्ञानदेव पाटील, अशोक बागवे, शशिकांत नाटेकर, उदय घाडी, संजय केळूस्कर, दिलीप कावले, मंदार सांबारी, मांगिरीष सांबारी, सचिन हडकर, रुपेश हडकर, किशोर आचरेकर यांसह बहुसंख्येने आचरा चिंदर, त्रिंबक, वायंगणी, तोंडवळी, बांदिवडे चे ग्रामस्थ सहभागी झाले होते. या प्रचार रॅलीनंतर बोलताना जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी यांनी मतदार राजाचा महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg