loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्कर्ष सेवाभावी संस्था व इन्फिगो आय केअर यांच्या विद्यमाने मोफत डोळे तपासणी उपक्रम

रत्नागिरी :- उत्कर्ष सेवाभावी संस्था आयोजित व इन्फिगो आय केअर यांच्या सौजन्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील १०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाला. यावेळी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर , नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक संदीप सुर्वे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, विश्वस्त गणेश सलीम, सामाजिक कार्यकर्ते संदीप रसाळ, इन्फिगो आय केअरचे ब्रांच मॅनेजर सुशांत पांचाळ, मार्केटिंग हेड मंगेश पावस्कर व शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमात रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव येथील शंभर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg