खोपोली: खंडाळा घाटात गॅस टँकर उलटल्यामुळे टप्प झालेली वाहतूक कोंडी 32 ते 33 तासांनंतर मोकळी झाली. गुरुवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. मात्र आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 1: पुणे-मुंबई मार्गावर आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकरचा अपघात आणि आता लोणावळ्याजवळ बंद पडलेला सिमेंट कंटेनर यामुळे गेल्या दोन दिवसांत दुसऱ्यांना हा मार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. लोणावळ्याजवळ 20 किमीपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहने संथ गतीने पुढे जात आहेत. आडोशी बोगद्याजवळ काल गॅस टँकर उलटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहने अडकून पडली होती. तब्बल 32 तासांच्या प्रयत्नांनंतर हा टँकर मार्गावरून हटवण्यात यश आले, मात्र कोंडी फुटेत न फुटते तोच तळेगाव ते मळवली दरम्यान एक सिमेंट कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
लोणावळा परिसरात सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर रस्त्यातच बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र, नुकत्याच वाहतूक कोंडीतून बाहेर पडल्या वाहनांच्या पुन्हा लांब रांग लागल्या आहेत. सध्या लोणावळ्यापासून 20 किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकून पडली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांना या भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.