loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने व्हिजन प्रभाग खेड परिवारातर्फे जि. प. शाळेतील स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून शिबीर

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने व्हिजन प्रभाग खेड परिवारातर्फे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा चांगल्या प्रकारे व्हावी, तसेच त्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून २१ दिवसाचे शिबिर कन्या शाळा, दस्तुरी व भरणानाका या तीन शाळेमध्ये आयोजित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर शिबिरामध्ये १४६ विद्यार्थी असून त्यामध्ये मुलांना सकाळी नाष्टा, दुपारी जेवण व संध्याकाळी खाऊ वाटप करण्यात येतो. लायन्स क्लबचे सदस्य ला.नईम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबिरातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी मा. विजय दाजी बाईत, लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ.वीरेंद्र चिखले, अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकने, हेडक्वार्टर इंचार्ज रोहन विचारे, लायन माजीअध्यक्ष पंकजभाई शहा, ला.अनिल मोरे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg