loader
Breaking News
Breaking News
Foto

गोळपमध्ये श्री साईबाबा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार!

रत्नागिरी - मु.पो. गोळप, मानेवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी भाविकांसाठी असणार आहे. यावेळी ​कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण ​क्रिकेट स्पर्धा असून ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान 'भव्य नाईट आर्म क्रिकेट स्पर्धा' रंगणार आहेत. कार्यक्रमाचा ​मुख्य सोहळा १४ फेब्रु 2026 रोजी सकाळी असून यावेळी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ​सांस्कृतिक कार्यक्रम हे १३ फेब्रुवारीला हळदी-कुंकू, भजन व रेकॉर्ड डान्स, तर १४ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मळदोबा नमन मंडळ, नाखरे यांचा 'कंसाचे गर्वहरण' हा पौराणिक नमन कार्यक्रम होणार आहे. यावेळी आयोजक ​सागर शशिकांत मोहिते परिवार व मित्र परिवारातर्फे आयोजित सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg