loader
Breaking News
Breaking News
Foto

नवभारत छात्रालय परिवारातर्फे दापोली येथे काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

दापोली (प्रतिनिधी) - कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे दापोली येथे काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गास शेतकरी, उद्योजक व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नाव नोंदणीने झाली. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांची ओळख व प्रशिक्षणाबावत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणामध्ये काळीमिरी लागवडपूर्व तयारी, योग्य जमीन व हवामान, सुधारित जाती, लागवड तंत्रज्ञान, आधार वृक्ष, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, उत्पादन खर्च, प्रतिहेक्टर उत्पादन व निव्वळ नफा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रशिक्षण वर्गात कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष व प्रशिक्षक प्रा. प्रभाकर शिंदे तसेच संघाचे सदस्य व प्रशिक्षक डॉ. राजन खांडेकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रत्यक्ष क्षेत्रभेट व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष काळीमिरीची काढणी करणे, काळीमिरी घडापासून दाणे वेगळे करण्याच्या पद्धती, उष्णजल, सोलरायझेशन प्रक्रिया, काळीमिरीची रोपवाटिका तयार करण्याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. कोळबांद्रे प्रक्षेत्रावर प्रशिक्षकांना नेऊन नारळ, काजू, आवळा, आंबा, चिकू, सिमेंट पोल इत्यादींवर केलेली काळीमिरीची लागवड शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. काळीमिरीची लागवड सर्व आवश्यक खते घालून प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आली. काळीमिरीसाठी पाणीपुरवठा करणाच्या पद्धती विषयी माहिती देण्यात आली.

टाइम्स स्पेशल

प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व प्रशिक्षण टिप्पणी वितरित करण्यात आली. या कार्यक्रमास कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष व प्रशिक्षक प्रा. प्रभाकर शिंदे, सदस्य व प्रशिक्षक डॉ. राजन खांडेकर तसेच संघाचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजेंद्र शिंदे, सुनील ठाकूर, राजकिरण शिंदे, वर्षा गोरीवले, कीर्ती घाग, रेणुका शिंदे, कोमल जावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणामुळे काळीमिरीसारख्या उच्च मूल्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन उत्पन्न वाढीस चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg