loader
Breaking News
Breaking News
Foto

बनावट सोने देवून फायनान्स कंपनीची फसवणूक करणारा फरार आरोपी गजाआड

पनवेल (वार्ताहर) - बनावट सोने देवून एका फायनान्स कंपनीची फसवणूक करून गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पनवेल येथील मंगल क्रेडीट अ‍ॅण्ड फिनक्रॉप फायनान्स लिमीटेड येथे आरोपी करेश सुभाष भोईर याने सोन्याच्या बनावट दोन वस्तू तारण ठेवून त्याच्यावर 1 लाख 80 हजार रुपये काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच तो वेग-वगेळ्या ठिकाणी अस्तीत्व लवपून राहत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांनी आरोपीला शोधून काढण्याचे आदेश देताच पोलीस उप निरीक्षक हजरत पठाण, पोना प्रविण मेथे, भास्कर चौरे आदींच्या पथकाला गुप्त बातमीदाराने सदर आरोपी हा पनवेल शहर परिसरात आल्याची माहिती दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक, हजरत पठाण करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg