loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरीबांध येथे ११ रोजी सदानंद माऊली महाराजांचा जन्मोत्सव सोहळा

मालवण : (प्रतिनिधी) - परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव सोहळा बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरीबांध, मालवण येथे साजरा होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता परमपूज्य महाराजांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक व महापूजा याने होणार असून, दुपारी १२.३० वा. मध्यान्ह आरती व दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.१५ वाजता धूपारती, होणार असून, रात्री ८ वाजता घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे (बुवा – नाना सामंत) यांचे भजन होईल. रात्री ९ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, पेंडुर, कट्टा (बुवा – शामसुंदर आचरेकर) यांचे भजन होणार आहे. तर रात्री १० वा. सांप्रदायिक भजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व भक्तांनी व माऊली परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली परिवार, श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवणचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg