loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुक्यात ५७.१२% मतदान, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची मतदान केद्राना भेट

देवगड (दयानंद मांगले) - देवगड तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समिती गणातील मतदानासाठी शनिवारी स.७.३० वा.शांततेत सुरुवात झाली . सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ५७.१२ % एवढे मतदान झाले. यात पुरुष मतदार १५६९७ व स्त्रिया मतदार १४६५५ व इतर १ एकूण ३०३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी ११.५३ %एवढी होती. त्यानंतरच्या पुढील दोन तासात त्यात वाढ होऊन स.११.३० वाजे पर्यंत २८.०२ टक्के एवढी होऊन त्यानंतर त्यापुढील कालावधीत मतदारांचा ओघ वाढला व दु १.३० वा पर्यंत त्यात वाढ होऊन ही टक्केवारी ४१.७४%टक्क्यांवर गेली. देवगड तालुक्यात ३ जिल्हा परिषद गटाकरिता ९ उमेदवार रिंगणात असून ८ पंचायत समिती गणाकरिता १६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत तालुक्यातील २६,६७६ पुरुष व २६,४६५ महिला मतदार आहेत. त्या पैकी ११,३०९ पुरुष व १०,८७५ स्त्रिया एवढ्या मतदारांनी दु.१.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पुन्हा मतदानाचा ओघ कमी होत. दु ३.३० पर्यंत ४९.४५ टक्के मतदान झाले. यात पुरुष १३,४५७ स्त्रिया १२,८२४ मतदार यांनी मतदान केले. आणि दुपारच्या सत्र नंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. यात पुरुष १५६९७ स्त्रिया १४,६५५ इतर १ एकूण ३०३५३ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजाविला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विजयदुर्ग, पुरळ हुर्षी या मतदान केंद्रावर भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार रमेश पवार, बापर्डे मंडळ निरीक्षक विनायक शेट्ये, निवडणूक ऑपरेटर बाजीराव काशीद, कोतवाल प्रणित सावंत उपस्थित होते. जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक मतमोजणी सोमवार दि ९ फेब्रुवारी रोजी स.१० वाजले पासून देवगड तहसीलदार कार्यालय येथे होणार असून त्यासाठी ११ टेबले द्वारे ९ फेऱ्यामधून ही मतमोजणी होणार आहे. त्या करीता विशेष मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

शनिवारी सकाळी ७.३० वाजले पासून देवगड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत हे सर्व माहिती घेत होते. देवगड तालुक्यातील ८ मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाल्याने ८ सीयू आणि बियू मशीन बदलण्यात आल्या. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवगड तहसीलदार रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस भरत धुमाळ यानी सर्व मतदान केंद्रावर कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg