loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का; तालुकाप्रमुख शेखर घोसाळेंचा राजीनामा

रत्नागिरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर चंद्रकांत घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनेत मोठी खळबळ माजली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुकांच्या तोंडावर किंवा संघटनात्मक बांधणी सुरू असतानाच तालुकाप्रमुख सारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने रत्नागिरीत विविध चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की यामागे काही राजकीय नाराजी आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. आता जिल्हाप्रमुख हा राजीनामा मंजूर करतात की घोसाळे यांची मनधरणी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg