loader
Breaking News
Breaking News
Foto

हवामान बदलाचा हापूसला मोठा फटका; देवगडमध्ये आंबा मोहोर करपला!

देवगड( दयानंद मांगले)(प्रतिनिधी): कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर यावर्षी निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही बदलत्या हवामानामुळे फळधारणा अल्प झाली असून, आलेला मोहोर करपून काळा पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील विविध गावांमध्ये 'क्षेत्रीय पाहणी दौरा' करून परिस्थितीचा आढावा घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे आणि शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे यांच्या उपस्थितीत मिठबाव, कातवण, कुणकेश्वर आणि इळये येथील बागांची पाहणी करण्यात आली. यावेळी खालील मुख्य बाबी समोर आल्या: परागीभवनात अडथळा: जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमानात झालेल्या अचानक बदलामुळे (कमी तापमान) परागीभवन नीट झाले नाही, परिणामी फळधारणा झाली नाही. वांझ मोहोराचे प्रमाण: अनेक ठिकाणी मोहोर तर आला, पण त्यात 'संयुक्त फुलांचे' प्रमाण कमी असल्याने तो 'वांझ' ठरला. फळगळ: ज्या ठिकाणी फळे लागली होती, तिथे सुपारीच्या आकाराची फळे गळून पडत असल्याचे निदर्शनास आले. करपा रोग: सुरुवातीचा मोहोर पूर्णपणे करपून काळा पडला आहे, तर आता काही ठिकाणी तिसऱ्या बहराचा मोहोर फुटत आहे. तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी सुचवलेले प्रभावी उपाय बागायतदारांनी खचून न जाता बागेचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करावे, यासाठी पथकाने खालील उपाययोजना सुचवल्या आहेत: जुन्या मोहोराची छाटणी: नवीन मोहोर येण्यासाठी झाडावरील जुने, वाळलेले आणि करपलेले मोहोराचे दांडे कापून टाकावेत, जेणेकरून झाडाची ताकद नवीन मोहोरासाठी वापरली जाईल.

टाइम्स स्पेशल

अन्नद्रव्य व्यवस्थापन: मोहोराची गुणवत्ता वाढवण्यासाठी ०:५२:३४ + बोरॉन (२०%) ची फवारणी करावी. तसेच फळधारणेनंतर १३:००:४५ आणि प्लॅनोफिक्सचा वापर करावा. सिंचन आणि ओलावा: झाडाला साधारणतः १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. बागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाच्या बुंध्याशी गवताचे आच्छादन (Mulching) करावे. कीड-रोग नियंत्रण: तुडतुडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक व बुरशीनाशकाची वेळीच फवारणी करावी. धुरीकरण: हवामानातील बदलाचा ताण कमी करण्यासाठी बागेत सायंकाळच्या वेळी काडीकचरा पेटवून हलके धुरीकरण करावे. सद्यस्थितीत तिसऱ्या बहराचा मोहोर येत असला, तरी हवामानाची साथ मिळाल्यासच काही प्रमाणात उत्पादन हाती येईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

देवगडचा हापूस संकटात, कृषी विभागाकडून पाहणी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg