loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्याच्या मार्केटमध्ये १३ मीटर बॉक्स जळून खाक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्याच्या महागिरी मार्केटमध्ये असलेल्या त्रिमूर्ती रेसिडेन्सी या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या विद्युत मीटर बॉक्समध्ये ११.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत तब्बल १३ विद्युत मीटर जाळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाण्यातील महागिरी मार्केटमध्ये रात्री आग लागल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, ठाणे महापालिका जवाहरबाग अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ठाणे नगर पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यावर ती आग २० ते २५ मिनिटात संपूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र या घटनेत तळ अधिक ५ मजली इमारतीमधील १३ मीटर बॉक्स जळून खाक झाले. यावेळी दोन फायर आणि तीन रेस्क्यू वाहने पाचारण करण्यात आली होती. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg