पणजी (प्रतिनिधी) - जगदगुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून ओल्ड गोवा येथे उभारण्यात आलेल्या भव्य व आकर्षक अशा गोवेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा लाखोे भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरू झाला. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन घडविणारी भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेने उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फेडले. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणाच्या लोककला आणि संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून पहायला मिळाले. या शोभायात्रेने गोवेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळयाची सुरूवात झाली. जगदगुरू नरेंद्राचार्याजी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली श्री देव गोवेश्वराचे भव्य दिव्य शिवमंदिर ओल्ड गोवा येथे उभारण्यात आले असून त्याच्या प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळयाची सुरूवात झाली आहे. ३ दिवसांचा हा सोहळा असून रविवारी महाशिवरात्रीच्या मंगलदिनी (१५ फेब्रुवारीला) जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे लोकार्पण गोव्याच्या राज्यपालांच्याहस्ते होणार आहे. या सोहळयानिमित्ताने शुक्रवारी ही शोभायात्रा काढण्यात आली. शिस्तबद्ध अशी मिरवणूक पाहून गोवेकर सुखावले.
ही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा लाखो भक्त आणि गोवेकर उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, गोवा येथील विविध पथकांनी आपली कला सादर केली. या शोभायात्रेने सर्वाच्या डोळयाचे पारणे फेडले. या यात्रेने प्राणप्रदक्षिणा घातली. या शोभायात्रेच्या अग्रस्थानी जगदगुरू नरेंद्राचार्याजी संस्थंानची हत्तीण नारायणी सर्वांना अभिवादन करीत होती. बालगोपाळांचे ती आकर्षण ठरली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या पथकांनी सुरूवातीला कलशधारी व निशाणधारी महिला होत्या. त्यामागे निशाणधारी पुरूषंाचे पथक होते. विविध कला सादर करणारी पथके, सजीव देखावे यांचा यामध्ये समावेश होता. शोभायात्रेचा बॅनर, त्यानंतर गोवापीठ युवासेनेचे रोमटा मेळ हे पथक होते. तसेच लोकसरीता हे गोवा राज्याचे पथक होते. रत्नागिरीच्या ग्रामपंचायतन देखावा व भंडार्याचा शिव पार्वती विवाह देखावा होता. पश्चिम महाराष्ट्र पीठ युवासेनेच्या डीजेने सारा परिसर दणाणून सोडला.
दक्षिण अहमदनगरचा संत शिरोमणी गजानन महाराज देखावा हा आकर्षक होता. सांगलीचे गुरूकुल आश्रम व हलगी वादन, लातूरचे माऊली माऊली पथक यात्रेचे आकर्षण ठरले. धार की गुरूवंदना, संभाजीनगर चे कुंभमेळा पथक, कारवारचे सिंहउत्सव पथक होते. नंादेडच्या महिलांचे लेझिम पथकाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. नागपूरचे वाघ बिर्ला, गोंदियाचे शिवतांडव नृत्य, मुंबईचे वारकरी भजन, उत्सव समीतीचा जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी यांचा रथ, गोव्याचे ढोलवादन पथक शोभायात्रेचे आकर्षण ठरले. प.पु.कानिफनाथ महाराज यांचा देखील रथ या यात्रेत सहभागी झाला होता. उत्तर महाराष्ट्र पीठ युवासेनेने देहदान, अवयवदान याबाबत जागृती करणाचा देखावा सादर केला. मुंबई पीठ युवासेनेचे गरबा नृत्य, दक्षिण नांदेडचा महादेव पिंड देखावा, बेळगावचे चंडी वाद्य, गोवा उत्सव समीतीचे महाशिवलिंग रथ, नवी मुंबईचा हिंदू धर्म एकता देखावा, वारकरी देखावा, गुजरातच्या डांग व बडोदा जिल्हयाचे गरबा नृत्य सर्वांचे लक्षवेधून घेत होते. सिंधुदुर्गचा दशावतार देखावा सर्वांचे आकर्षण ठरला. पश्चिम पालघरचे कोळी नृत्य, धाराशीवचा रामपंचायतन देखावा, जोयतचा शिमगा, धारवाडचे हलगी वादन, अमरावतीचे लेझीम पथक, गुलबर्गाचे अक्का महादेव, भरतनाटयम पथक यात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेने ग्रामप्रदक्षिणा पुर्ण केली. ठिकठिकाणी तिचे स्वागत झाले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.