पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उलवेनोड येथे केले. गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोड मधील रामशेठ ठाकूर मैदानावर दिनांक २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी प्रमुख संयोजक म्हणून ते बोलत होते.
आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १२८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी झाले आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असून सुसज्ज अशी चार क्रीडांगणे, मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, नाश्ता, भोजन, तसेच इतर पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच कबड्डीप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.