loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी कालव्याला गळती, शेतकर्‍यांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) - तिलारी प्रकल्पातून बांदा शाखा कालव्यात नुकतेच पाणी सोडण्यात आल्यानंतर सुरुवातीला शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते; मात्र आता याच पाण्यामुळे नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणी नियंत्रणाबाहेर जात असून शेती, रस्ते आणि स्थानिक नागरिकांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कालव्याच्या भिंतींमध्ये पडलेल्या भेगा आणि झिरपणार्‍या पाण्यामुळे काही भागांत पाणी थेट शेतांमध्ये शिरत आहे. परिणामी काही ठिकाणी जमिनी दलदलीत बदलत असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाजीपाला आणि उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त ठरलेले पाणीच आता पिकांच्या मुळांना धोका निर्माण करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, बांदा—दाणोली मार्गावरील विलवडे परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. येथे कालव्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. सतत पाणी साचल्यामुळे डांबरी रस्ता उखडू लागला असून खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना तसेच पादचार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कालव्याच्या वाढलेल्या दाबामुळे काही भागांत पाणी घरांमध्ये घुसल्याच्या घटनाही घडल्या आहेत. भविष्यात कालव्याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. तिलारी पाटबंधारे विभागाने तातडीने सर्व गळतीग्रस्त ठिकाणांची पाहणी करून दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यावर साचणारे पाणी थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व शेतकरी यांच्याकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg