loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. व पं. स. निवडणूकीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडत होत्या, या पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात - अझीम सुर्वे

खेड - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ या निवडणूकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन सारख्या बंद पडत होत्या आणि त्याच ईव्हीएम मशिनवर मतदान करण्यात येत होते. परंतु या बदलाबाबत आमच्या उमेदवार पोलिंग एजंटना विश्वासात न घेता संशयास्पद बदल केल्याचे दिसून येते. या सर्व निवडीमध्ये एकाच पक्षाच्या उमेदवारांना मतदान कसे पडले? तसेच बर्‍याच मतदान केंद्रामध्ये निवडणुकी दरम्यान ईव्हीएम मशिन बंद पडत होत्या. तरी आपण याबाबत सखोल चौकशी करावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता या पुढील होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपर असेल तरच आमचा राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष निवडणुक लढेल. अन्यथा ईव्हीएम निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदन कॉंग्रेस चे खेड चे अध्यक्ष अझीमभाई सुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभाग खेड यांना दिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

खेड काँग्रेस चे निवेदन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg