रत्नागिरी/संगमेश्वर : तालुक्यातील सैतवडे-बलभीमवाडी आणि संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते परिसरात बिबट्याने आपला मोर्चा पुन्हा एकदा पाळीव प्राण्यांकडे वळवला असून, एका वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या अंतराने शिकारीची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैतवडे येथील अशोक हिराजी सावंत यांच्या मालकीच्या वासराला पहाटेच्या सुमारास बिबट्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे, आदल्या रात्री परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा वाडीत रंगली आहे. कार्यक्रमाच्या गजबजाटातही बिबट्याचा वावर असल्याने तो आता माणसांना न घाबरता लोकवस्तीत घुसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ल्यात भरवस्तीत बिबट्याने वासरावर हल्ला करून अर्धवट खाल्ल्याचे आढळून आले. बिबट्याला जेरबंद करावे आणि परिसराला भयमुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
टाइम्स स्पेशल
रबाळे पोलिसांची कॉम्बिंग मोहीम; १४ आरोपींवर गुन्हे, देशी कट्टा जप्त




















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.