चौक (अर्जुन कदम) - समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांच्या मदतीने होणारे अपघाताचे प्रमाण कमी झाले असून, असेच सहकार्य राहू द्या, अशी अपेक्षा अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (भारतीय पोलीस सेवा) यांनी व्यक्त केली. ते वाहतूक शाखेच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण व अपघातग्रस्त यांना मदत करणार्या संस्था, कार्यकर्ते यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. रस्ता अपघात नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वाहनचालकांना शिस्त लावणे, हेल्मेट-सीटबेल्टचा वापर वाढवणे आणि रस्ता सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश घराघरात पोहोचवणे हा आहे.
रस्ते अपघातांमुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण करणे, या काळात जनजागृती रॅली, हेल्मेट सक्ती तपासणी, ट्रॅफिक नियमांचे शिबिर, चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे, कारमध्ये सीटबेल्ट वापरणे, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून गाडी न चालवणे आणि मोबाईलचा वापर टाळणे या जागृतीवर भर दिला जातो. भारतात या अभियानाची सुरुवात १९८९ मध्ये झाली. यावेळी अपघातग्रस्त यांना मदत करणारे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक(वाहतूक) तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक पुष्पलता दिघे, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, पोलीस निरीक्षक विनोद माळवे, पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, अपघातग्रस्त टीम आणि त्यांचे प्रमुख गुरूनाथ साठेलकर उपस्थित होते.
हेल्प फाउंडेशन चे गुरुनाथ साठेलकर यांनी सहकार्याची भूमीका पाळली तर अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, पोलीस उप निरीक्षक देवीदास नाईक, पोलीस उप निरीक्षक संजय संजय टिळेकर, सर्व पोलिस अंमलदार यांनी केले. यावेळी रत्नागिरी, रायगड येथील वाहतूक पोलिस, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.