loader
Breaking News
Breaking News
Foto

माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये देवघर सोंडे ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला

खेड - दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये विजेत्या ग्रामपंचायतीना पुरस्कार वितरण सोहळा डोह - सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरली मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायत देवघर सोंडेने माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये उत्कृष्ट असे काम केले आहे. गावातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन पंचायतीने मागील दोन वर्षापासून हे अभियान गावांमध्ये प्रभावीपणे राबवित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माझी वसुंधरा हे अभियान महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत चालवलेले एक प्रमुख अभियान आहे. याचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे जतन, संरक्षण व संवर्धन करणे हा उद्देश आहे. हे अभियान निसर्गाच्या पंच महाभूतांवर म्हणजे भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यावर लक्ष केंद्रित करून होत असलेला हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मानवाच्या शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे साठी केलेला आहे. सदर अभियान राबवण्यासाठी कुशल मार्गदर्शन समितीचे मान. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकासधिकारी विजय करपे, विस्तार अधिकारी नाथा पाटील, देसाई, कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, गावडे, लोहार यांचे मिळाले आहे.

टाइम्स स्पेशल

सदर अभियान सरपंच सुनील बाबुराव मोरे, उपसरपंच रविंद्र दत्ताराम इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक तुकाराम कदम, माजी उपसरपंच नामदेव राजाराम सोंडकर, माजी उपसभापती रवींद्र मोरे, सभासद दिपाली मोरे, कांचन मोरे, पुष्पा मोरे कर्मचारी किरण मोरे, गणेश मोरे, प्रशांत सोडकर, जगदीश सोंडकर, न्यू इंग्लिश स्कूल देवघर निवाचीवाडी मुख्याध्यापक पाटील जि. प. शाळा सर्व मुख्याध्यापक सहशिक्षक , अंगणवाडी सेविका सर्व, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुधीर मोरे, पोलस पाटील प्रवीण कुमार काणे, संजय सोंडकर, ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मोरे, अंकुश मोरे, राजेंद्र जाधव, विलास मोरे, सीआरपी उर्मिला उमेश मोरे, बचत गटाचे सर्व सभासद यांच्या नेतृत्वाखाली गावात माजी वसुंधरा अभियान राबविण्यात आले आहे. विजेत्या ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह सन्मानपत्र व 50 लाख रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे देवघर सोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg