loader
Breaking News
Breaking News
Foto

दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–२०२६ उत्साहात संपन्न

दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित दापोली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–२०२६ उत्साहात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व होता. ही वक्तृत्व स्पर्धा संघटनेचा पहिलाच उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जाणून घ्यावेत, त्यांच्या जीवनावर अधिक वाचन करावे आणि आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे: गट १ (पहिली ते दुसरी): प्रथम – इशा प्रशांत गुंदेकर (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली). द्वितीय – अलेक्स फिलिप गावित (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली). तृतीय– श्रेया शशिकांत शिर्के (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल,दापोली) गट २ (तिसरी ते चौथी): प्रथम– शिवानी शामराव जवळगे(सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल,दापोली) द्वितीय – आर्या ज्ञानेश्वर शिंद(आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर, दापोली) तृतीय – प्रज्ञा प्रशांत धुमाळ (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली) गट ३ (पाचवी ते सातवी): प्रथम – सार्थक शिवराज रक्षे (ए.जी. हायस्कूल, दापोली) द्वितीय – काव्या गणेश शेरे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली) तृतीय – गार्गी भरत तुरे (मराठी मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली) गट ४ (आठवी ते दहावी): प्रथम – काव्या दिलीप धामणे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली) द्वितीय – गौरी विकास माने (वराडकर हायस्कूल, मुरुड) तृतीय – पूर्वी गजानन पावसे (व्ही.के. जोशी हायस्कूल, करजगाव).

टाइम्स स्पेशल

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, मेंटॉर्स अरुण गांधी, राहुल साबळे, आशिष मेहता, समीर गांधी, समीर तलाठी, सोहनी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अनिल शेठ, संघटनेचे उपाध्यक्ष निकेत मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, सचिव मयुरेश शेठ, खजिनदार स्वप्निल मेहता, प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता तसेच संघटनेचे पदाधिकारी साहिल कडके, सिद्धेश शेठ, परेश बुटाला व सदस्य सीए ऋषिकेश शेठ, स्वामी बुटाला, सार्थक बुटाला, साहिल बुटाला, संदेश मेहता, अमित मेहता उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजक राहुल राठोड, राजेश घोसाळकर, कांचन मपारा, संकेत मेहता, प्रितम शिंदे, सिद्धेश कर्देकर तसेच सोहनी विद्यामंदिरातील गमरे व केतन बुटाला यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शर्मिला शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली गेली. परीक्षक म्हणून कैलास गांधी, कुणाल मंडलिक, अजिंक्य मुलुख, अनिरुद्ध सुतार, सुनिल कदम, आदित्य रिसबुड, पार्थ सामल व श्रुती साखळकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता, सीए ऋषिकेश शेठ तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

८९ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg