संगमेश्वर (सत्यवान विचारे)- कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय बनून राहिलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी ३०० कोटींच्या आराखड्यास अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारकाच्या उभारणी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी ३१३ कोटींचा आराखडा तयार करून शासनास सादर केला आहे. येथील सुमारे ५ एकर वास्तव जागा व नियोजित १०० एकर परिसर संपादित करून भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी कोकणातील जनतेची मागणी आहे. हे स्मारक होणे येथील लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे.
यासोबत शास्त्रीपुल ते शृंगारपूर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मार्गाचा सर्वांगीण विकास करण्यात यावा शृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराज यांची सासरवाडी असून या मार्गावर मालोची राजे घोरपडे कारभाटले यांची समाधी देखील आहे. संबंधित स्थळांचा राष्ट्रीय दर्जाने विकास केल्यास ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच कसबा परिसरात सुमारे ३०० पुरातन मंदिरे असून त्या सर्व परिसराचा एकात्मिक विकास आराखडा राबवण्यात आल्यास सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनासाठी हे केंद्र ठरू शकते. त्याबरोबरच स्मारका नजीक शास्त्री नदीवरती कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ६६ कोटी २२ लाख ७३ हजार रकमेचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर केले आहे. तरी आता होणाऱ्या अर्थसंकल्प २०२५-२६ च्या अधिवेशनात दोन्ही प्रस्तावित आराखड्यास मान्यता देऊन आराखड्यातील टप्प्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीस लवकरात लवकर प्रारंभ करता येईल, असे आमदार शेखर निकम यांनी या निवेदनात नमूद केले आहे.



















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.