मुंबई - मुंबई पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबईतील ५१,००० पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना किंवा गणवेशात असताना सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगविषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले. या आदेशामागील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत त्यांमध्ये अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना पोलीस ठाणी, शस्त्रे आणि सरकारी वाहने यांचे चित्रीकरण करत होते. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांमध्ये खाकी स्वॅग नावाचा ट्रेंड लोकप्रिय झाला होता.
मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता आणि गांभीर्य भंग पावत असल्याचे समोर आले आहे. विधानसभेतही काही आमदारांनी पोलिसांच्या या सोशल मीडिया वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या नव्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅब'ला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. ही लॅब आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब सारख्या सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल. जर कोणताही कर्मचारी नियमांचे उल्लंघन करताना आढळला, तर त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाणार आहे. पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक आणि नागरी मर्यादेतच व्हावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.