loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाची सीबीआय चौकशी होणारः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील नेमकं कारण, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा शोध घेण्यासाठी सीबीआयमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी आता अधिक गतीने सुरू झाली असून या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या अपघाताच्या कारणांचा सर्वांगीण तपास करण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विमान अपघातामागील नेमकं कारण, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा शोध घेण्यासाठी सीबीआयमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि विमान संचालनाशी निगडित बाबींचा तपशील तपास यंत्रणेकडून गोळा केला जात आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडूनही या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, उड्डाणापूर्वीची तपासणी, पायलटची माहिती आणि हवामान परिस्थिती यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. अपघातावेळी कॉकपीटमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा मिळवण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती पुनर्प्राप्त करून अपघाताचा अचूक घटनाक्रम समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणाशी संबंधित VSR कंपनीच्या कामकाजाचे ऑडिट डीजीसीएकडून करण्यात येत आहे. विमानाच्या देखभाल व तांत्रिक सेवांमध्ये कोणतीही त्रुटी झाली का, याची तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “अपघाताची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होईल. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्व यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg