loader
Breaking News
Breaking News
Foto

​काजू बागायतदारांचे पंचनामे करून हेक्टरी २.५० लाख मदत द्या; सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - आंब्याप्रमाणेच काजू बागायतींचेही लहरी हवामानामुळे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाने याचे तातडीने पंचनामे करावेत आणि बागायतदारांना हेक्टरी २.५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार-शेतकरी संघाने केली आहे. या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले आहे. ​यावर्षी वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे काजूचा मोहोर मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. यामुळे काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग फळबागायतदार-शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी यांनी कृषी विभागाची भेट घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामानामुळे जळालेल्या मोहोराचे पंचनामे विनाविलंब सुरू करावेत. नुकसानीचे अहवाल महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शासनाकडे पाठवावेत. काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २.५० लाख रुपये भरपाई मिळावी. ​यावेळी बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे, त्यामुळे सरकारने तातडीने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg