सावंतवाडी : शांतताप्रिय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीच्या सौंदर्यात मोती तलाव आणि नरेंद्र डोंगराचा मोठा वाटा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून वाढता आवाज आणि फटाक्यांच्या प्रदूषणामुळे येथील जैवविविधतेला मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः शहरात मोती तलावाच्या काठावर पांढरे बगळे आणि दुर्मिळ वटवाघळांनी आता आपली निवासी ठिकाणे बदलण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला मोती तलाव आणि शहराला लागून असलेला नरेंद्र डोंगर हे केवळ पर्यटनाचे केंद्र नसून, विविध जीवसृष्टीचे आश्रयस्थान आहेत. तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने पांढऱ्या बगळ्यांचा वावर असतो, तर काठावरील जुन्या वृक्षांवर वटवाघळांच्या मोठ्या वसाहती पाहायला मिळतात.
आजच्या काळात वटवाघळांचे अस्तित्व सर्वत्र धोक्यात आले असताना, सावंतवाडीतील भरवस्तीत त्यांचे अस्तित्व टिकून आहे ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, अलीकडच्या काळात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि आवाजाच्या प्रदूषणामुळे ही वटवाघळे सैरभैर होताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सण-उत्सवांच्या काळात होणारी मोठ्या प्रमाणावरील फटाक्यांची आतषबाजी आणि कर्णकर्कश आवाजामुळे येथील शांतता भंग पावत आहे. या आवाजाला घाबरून पांढऱ्या बगळ्यांनी आपली पारंपरिक निवासी ठिकाणे बदलल्याचे दिसून येत आहे. हीच परिस्थिती वटवाघळांच्या बाबतीतही घडत असून, त्यांना आवश्यक असलेली शांतता मिळत नसल्याने त्यांच्या वास्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सावंतवाडीची ओळख येथील शांततेमुळे आहे. जर येथील निसर्ग आणि पक्षीच टिकले नाहीत, तर शहराचे सौंदर्य हरवून जाईल. प्रशासनाने आणि नागरिकांनी या वन्यजीवांच्या रक्षणासाठी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे पर्यावरण प्रेमींनी मत व्यक्त केले आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.