loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख आगारातर्फे बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा मार्गदर्शन मेळावा संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग; देवरुख आगारातर्फे बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना रत्नागिरी चा कर्मचारी मार्गदर्शन पर मेळावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह देवरुख येथे संपन्न झाला. शिवजयंती चे औचित्य साधून महापुरुषांचे विचार पुढे नेत कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्‍या या संघटनेतर्फे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देवरुख आगारातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमप्रसंगी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विचार मंचावर उपस्थित असलेल्या व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणी व त्यांना करावा लागणारा सामना या संदर्भात खात्याच्या शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीवर ऍड. अशोक कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. या मेळाव्यात प्रत्येक कर्मचार्‍यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा जेणेकरून कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणी एकमेकांच्या सहकार्याने सोडविता येतील.

टाइम्स स्पेशल

शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती प्रत्येकाने समजून घेऊन येणार्‍या अडचणीवर मात करायला शिकले पाहिजे. जेणेकरून आपल्या वर अन्याय होणार नाही याची दक्षता घेता येईल. या मेळाव्याला विचार मंचावर ऍड. अशोक कांबळे, सुरेश जाधव यांच्यासह यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. मेळाव्याचा शिवजयंती निमित्त हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवरुख आगाराच्या सर्व कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg