loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते ‘सरपंच चषक २०२६’ चे जल्लोषात उद्घाटन!

सावंतवाडी: रेडी येथे सरपंच रामसिंग राणे पुरस्कृत ‘सरपंच चषक २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना नवी ऊर्जा, दिशा आणि एकात्मतेची प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे, उपसरपंच आनंद भिसे, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, सागर राणे, ए. टि. राणे, गोपाळ राऊळ तसेच रेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg