loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे परिसरातील शाळांना घरडा कंपनीकडून इंट्रॅक्टिव बोर्डचे वाटप आणि प्रशिक्षण

गुणदे (वार्ताहर): घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत परिसरातील 15 शाळांना 20 इंट्रॅक्टिव बोर्डचे वाटप करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या इंट्रॅक्टिव बोर्डमध्ये इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचा अभ्यासक्रम होम रिवाइज या शैक्षणिक कंपनीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पूर्वलोड करण्यात आला आहे. विषयानुसार अँनिमेशन, व्हिडिओ, सराव प्रश्नसंच, पुनरावृत्ती चाचण्या अशा विविध शैक्षणिक साधनांचा समावेश असल्यामुळे अध्यापन अधिक रंजक व प्रभावी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते शाळांच्या मुख्याध्यापकांना इंट्रॅक्टिव बोर्ड सुपूर्द करण्यात आले. तसेच शिक्षकांसाठी कंपनीमध्ये विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात इंट्रॅक्टिव बोर्डचा वापर, ‘होम रिवाइज’ सॉफ्टवेअरची हाताळणी, ई-कंटेंटचा प्रभावी उपयोग आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमासाठी घरडा कंपनीचे रामकृष्ण कुलकर्णी - व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स आणि बापुराव पवार - सी.एस.आर. मॅनेजर यांनी विशेष प्रयत्न केले. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक शाळेपर्यंत उपक्रम यशस्वीपणे पोहोचविला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम वेळेत व परिणामकारक पद्धतीने पूर्ण झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, घरडा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी परिसरात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, पाणी आणि कौशल्यविकास यांसारख्या क्षेत्रांत कंपनीचा सक्रिय सहभाग असून समाजाभिमुख कार्याची परंपरा कायम राखली जात आहे.

टाइम्स स्पेशल

या कंपनीचे संस्थापक व मालक कै. डॉ.के. एच. घरडा (पद्मश्री) यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच समाजसेवेचा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारातूनच अशा उपक्रमांना चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक आकर्षक, सुलभ आणि परिणामकारक होणार असून विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शाळा प्रशासनाने कंपनीचे आभार मानत अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg