loader
Breaking News
Breaking News
Foto

‘रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ उत्साहात

पनवेल :- गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर पार पडलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६’ स्पर्धेत पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी तर महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी संघाने विजेतेपद पटकाविले. दि. २० ते २२ फेब्रुवारी अशा तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १२८ पुरुष तर ३२ महिला संघांनी सहभाग घेतला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ऍड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन, पंचांची काटेकोर आणि निष्पक्ष कामगिरी तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला भव्य यश लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून खेळाडूंनीही उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले. आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा क्रीडा सोहळा संस्मरणीय ठरला आहे. हि स्पर्धा अत्यंत दिमाखदार आणि खेळाडूंसाठी सर्व सुविधांनी संपन्न झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी संघाने शिवाई बांधण संघाला पराभूत करून अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे शिवाई बांधण संघ उपविजेते ठरले. तृतीय क्रमांक जय बजरंग रोहा तर चतुर्थ क्रमांक जयभवानी वाशी पेण संघाने मिळवले. महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विजेता संघ ठरला. उपविजेता पनवेल स्पोर्ट्स क्लब पनवेल संघ, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे ओमकार वेश्वी व दत्तात्रेय क्रीडा पनवेल संघाने मिळविला.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडू तसेच स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या कबड्डीतील ज्येष्ठ कबड्डीपटू मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे माजी जनरल सेक्रेटरी ऍड. आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील, शिवसेना उबाठा गटाचे ज़िल्हा संघटक प्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक, कबड्डीप्रेमी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg