पनवेल - पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ५५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टिपर ट्रक मध्यरात्री चोरीस गेला आणि अवघ्या ८ तासांच्या आत गुजरातमधून जप्त करण्यात आला. तक्रारदार भास्कर घाडगे यांच्या मालकीचा डंपर क्रमांक MH 43 CK 3018 हा करंजाडे सेक्टर 2E परिसरातून 19 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री चोरीस गेला होता. तक्रार मिळताच पनवेल पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वाहनामध्ये बसवलेल्या GPS प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केले. तपासादरम्यान वाहन पालघरमार्गे गुजरातच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले.
क्षणाचाही विलंब न लावता विशेष पथक तयार करण्यात आले आणि थरारक पाठलाग करून वाहन महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करताच पालघर LCB आणि वलसाड LCB यांच्याशी समन्वय साधण्यात आला. गुजरात राज्यातील पारदी पोलीस ठाणे हद्दीत वाहन असल्याची माहिती मिळताच संयुक्त कारवाई करत संशयीत आरोपीला हरियाणाकडे पळ काढण्याआधीच जेरबंद करण्यात आले. या प्रकरणात संशयीत आरोपी मुरसलिम मकसूद खान, वय 30 वर्षे, रा. हरियाणा याला अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेला डंपर सुरक्षितपणे जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईसाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पालघर आणि वलसाड LCB यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
"गुन्हेगार कितीही लांब पळाला… तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही, हे पनवेल शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त पनवेल विभाग, वपोनि नितीन ठाकरे, पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विनोद लभडे, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा योगेश दिवेकर, पोहवा अविनाश गांथडे, पोहवा महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, सम्राट डाकी, पो.उप.नि. गोरख राठोड, नेम. पालघर LCB , पो.उप.नि. राकेश तळपडे, नेम. वलसाड LCB, गुजरात, योगेश, नेम. वलसाड LCB, गुजरात यांच्यामार्फत करण्यात आली.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.