वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील राजहंस नमन मंडळ रांजाणेवाडी गट क्र. १ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोकणातील प्रसिध्द असलेला वरवेलीचा संकासुर पर्यटकांचेही आकर्षण ठरत असून संकासुर नृत्य चाकरमान्यांना भुरळ पाडत आहे. या नमन मंडळाने शेकडो वर्षांची परंपरा अजूनही जोपासली आहे. सदरचे नमन मंडळ गाव भोवनीसाठी गावाबाहेर पडले आहेत. सुरुवातीला वरवेलीची ग्रामदेवत श्री हसलाई देवीच्या मंदिरामध्ये नमन करून आशीर्वाद घेण्यात येतो. श्री हसलाई देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर नमन खेळे रांजाणेवाडी येथील होळी तसेच दत्त मंदिर येथे नमन करण्यात आले. त्यानंतर श्री हसलाई देवीची बहिण असलेल्या निवोशी गावची ग्रामदेवता जाखमाता देवी, पालशेत गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. सदरचे देव खेळे असगोली, गुहागर या पंचक्रोशी मध्ये गावभोवणी साठी जातात. वरवेली रांजाणेवाडी येथील नमन खेळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा संकासूर म्हणून या संकासूराची ओळख आहे.
वरवेली येथील निसर्गसंपन्न डोंगराच्या कुशीत वसलेल्या साधारणतः चारशे लोकवस्तीची रांजाणेवाडी आहे. गावाच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक परंपरा उराशी बाळगुन ही वाडी स्वतःच्या प्रथा, परंपरा, पिढ्यांपिढ्या जपत आली आहे. येथील सर्व नमन कलाकार नोकरी व्यवसाय निमित्त मुंबई येथे राहत असतात. परंतु शिमगा सणामध्ये देवखेळ्यातून गाव भोवणीसाठीनिमित्त गावे येतात. मुंबई कुंभारवाड्याच्या गोल देऊळाच्या तिसऱ्या गल्लीत वाडीतील चाकरमानी बहुतांश राहत होते. साधारणतः १९७० साली भजनप्रेमी कै. बाळाराम महादेव रांजाणे यांच्या पहाडी आवाजाने भजनामध्ये मुंबईसह पंचक्रोशी गाजवली. त्याठिकाणी भजन करतानाच या भजन मंडळाच्या नावावर चर्चा व्हायच्या. राजहंस म्हणचे रांजाणेवाडीतील 'राज' आणि ग्रामदेवता हसलाईदेवीतील 'हंस' यापासून राजहंस या राजेशाही नावाने ओळख झाली. राजहंस नमन मंडळाचे देवखेळी दुसऱ्या होळीच्या दिवशी श्रीहसलाईदेवी मंदिरात नमन करुन तिचा आशिर्वाद घेऊन ही मंडळी पंचक्रोशी मध्ये गावभोवनीसाठी बाहेर पडतात.
या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी ही मंडळी अनवाणी पायाने फिरत असतात. आपल्या ग्रामदेवतेचे चिंतन हेच या प्रथा जपण्यास आपल्याला बळ देते असे ग्रामस्थ सांगतात. गेली अनेक वर्षे गाव भोवनीसाठी नमन खेळे विविध गावात जात असतात. यातील बहुतांश नमन मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र शिमगोत्सवात गावाकडे परतुन भोवतीच्या नमनखेळ्यात सहभागी होतात. जागरणकरुन मुंबईत सराव करायचा आणि शिमगोत्सवात भोवनीचे खेळे फिरण्यासाठी गावी यायचे, नमनाचे कार्यक्रम करायचे शिमगोत्सव संपल्यानंतर पुन्हा रोजीरोटीसाठी मुंबईत जायचे. आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वरवेली रांजाणे वाडीतील देव खेळे प्रसिद्ध आहेत.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.