मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या तीन परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दांडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण शहरात काही परप्रांतीय विक्रेते मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात गाद्यांचा लोड घेऊन फिरून विक्री करत असल्याचे शहरातील काही जागरूक तरुणांच्या निदर्शनास येताच देऊळवाडा येथे तरुणांनी तीन विक्रेत्यांना अडवून चौकशी केली. यावेळी या विक्रेत्यांकडून मोटरसायकल द्वारे विक्री करण्याचे तसेच मालवण शहरात विक्रीसाठी फिरण्याचे कोणतेही परवाने सापडून आले नाही. तसेच मोटरसायकल वर गाद्यांचा मोठा लोड असल्याने रस्त्यावरील इतर वाहने व पादचाऱ्यांना त्याचा अडथळा निर्माण होऊन अपघाताचीही भीती आहे. त्यामुळे तरुणांनी पोलीसांना पाचारण करत या गादी विक्रेत्यांना पोलीसांच्या स्वाधीन केले.
यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी वानोळे यांनी त्याठिकाणी दाखल होत त्या गादी विक्रेत्यांवर दांडात्मक कारवाई केली. यासाठी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कारवाईत श्रीराज बादेकर, हरीश पडते, अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, सुशांत तायशेट्ये, स्वप्नील घाडीगावकर, प्रदीप गावकर आदी तरुण सहभागी झाले होते. दरम्यान, मालवण शहरात अशाप्रकारचे मोटरसायकलवरून गादी विक्रेत्यांची रेलचेल वाढली असून इतरही काही वस्तू विकणारे परप्रांतीय विक्रेते शहरात दिसून येतात. या विक्रेत्यांकडे शहरात विक्री साठी फिरण्याचा कोणताही परवाना नसून नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या कारवाईत सहभागी झालेल्या तरुणांनी केला आहे.
मालवण बाजारपेठेत स्थानिक व इतर विक्रेत्यांकडून नगरपालिका कर वसुली करत असताना अशा प्रकारे बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांबाबत नगरपालिकेचे काय धोरण आहे, विनापरवाना शहरात फिरणाऱ्या या विक्रेत्यांवर नगरपालिका कारवाई का करत नाही ? असे प्रश्न तरुणांनी उपस्थित केले असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा विक्रेत्यांवर नगरपालिकेने लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.














































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.