loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणरत्न पतसंस्थेच्या रक्तदान शिबिराला उर्त्स्फूत प्रतिसाद

खेड : तालुक्यातील भरणे येथील कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शिवजयंती आणि पतसंस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. दापोली येथील संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला दयाळ गणाच्या पंचायत समिती सदस्या शमिका म्हादे, भूषण मोरे, ज्येष्ठ दिवाकर प्रभू, हर्षल शिरोडकर यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश नक्षे, उपाध्यक्ष तुषार धुलप, सुजित शिंदे, सचिन कुळे, नीलेश पंडम, श्रीकांत कदम तसेच व्यवस्थापक अमित धाडवे उपस्थित होते. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुरज धाडवे, राम रेमजे, भरत घोले, स्वरा उसरे, भाग्यश्री कडव, महेंद्र पवार, रामचंद्र बुदर, परशुराम दवंडे, संकेत शिंदे, सुरज जाधव, नम्रता खामकर यांनी प्रयत्न केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg