रत्नागिरी : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी नगरपरिषदने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा सविस्तर अर्थसंकल्प जाहीर केला आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि समाजकल्याण योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. नगरपरिषदेने 66 कोटी 58 लाख 43 हजार 470 रुपयांच्या आरंभीच्या शिल्लकीसह अर्थसंकल्प सादर केला असून, वर्षाअखेरीस 17 कोटी 96 लाख 96 हजार 819 रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. आगामी वर्षात विविध अनुदाने व स्थानिक करांद्वारे 337 कोटी 89 लाख 60 हजार 201 रुपये उत्पन्न अपेक्षित असून, 319 कोटी 92 लाख 63 हजार 382 रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी 3 कोटी 38 लाख रुपये, तर इतर घनकचरा व्यवस्थापनासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी ‘विशेष स्वच्छता मोहीम’ अंतर्गत 16 कोटी 15 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. नगरोत्थान राज्यस्तर अनुदानातून 51 कोटी रुपये आणि जिल्हास्तर अनुदानातून 30 कोटी 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी 15 कोटी रुपये आणि विशेष रस्ते योजनेसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी 2 कोटी 8 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेसाठी 10 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. एकूणच, विकासकामांना गती देत आर्थिक शिस्त राखणारा हा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी सभागृहात जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत नगर परिषदेला काही सूचना केल्या. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते. नगरपरिषदेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर भर देत पंचवार्षिक कर आकारणीच्या माध्यमातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या वीज बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या इमारतींवर सोलर पॅनल बसवून सौरऊर्जेचा वापर वाढविण्यात येणार आहे. पर्यटन विकासासाठी ‘क’ वर्ग पर्यटन निधीतून 4 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.



















































































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.