loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे रेल्वे स्थानकावर महानगरी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना अपघात

ठाणे (प्रतिनिधी) ठाणे रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात घडला. ठाणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ०७ वर आलेल्या ठाण्याहून महानगरी एक्सप्रेस (२२१७७) ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना महानगरी एक्सप्रेसच्या एस-५ व एस-६ कोचच्या खाली एक महिला पाय घसरून पडली. या अपघातात तरुणीचा हात खांद्यापासून तुटल्याची दुर्दैवी घटना घडली. या रेल्वे अपघातात सीमा शब्बीर शेख (वय २८) असे जखमी महिलेचे नाव असून सदरची महिला शांतिनगर, मोफतलाल उपनी सुभीता चाळ, रोटीमंगर, कछवामो येथे राहायला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जखमी महिलेला तत्काळ पोलिस व हमाल यांच्या मदतीने गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. अपघाताच्यावेळी महिला पूर्ण शुद्धीवर होती. स्टेशन मास्तर यांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागात ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तत्काळ उपचार सुरू केले. जखमी महिलेच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांना संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले.

टाइम्स स्पेशल

डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक आहे. त्यानुसार महिलेच्या आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg